भारतीय जनता पार्टी तर्फे सोहळा शिक्षक दिनाचा , सन्मान कोविड योद्ध्यांचा !

भारतीय जनता पार्टी तर्फे सोहळा शिक्षक दिनाचा , सन्मान कोविड योद्ध्यांचा !

भारतीय जनता पार्टी तर्फे 5 सप्टेंबर 2020 रोजी इन्सुली येथिल सांस्कृतिक सभागृहामध्ये सोहळा शिक्षक दिनाचा , सन्मान कोविड योद्ध्यांचा ! या कार्यक्रमाचे आयोजन .

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बांदा मंडल श्री महेश धुरी , सभापती सौ. मानसी धुरी , जि.प. सदस्य सौ. उन्नति धुरी, सिंधुदुर्ग बँक विद्यमान संचालक व माजी शिक्षण व आरोग्य सभापति गुरु पेडणेकर बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, ता.चिटणीस सौ.रूपा शीरसाठ,शेर्ले शक्ती केंद्र प्रमुख व डेगवे सरपंच प्रवीण देसाई, इन्सुली शक्ती केंद्र प्रमुख व निगुडे सरपंच समीर गावडे, इन्सुली ग्रा.स. महेश धुरी कास चे बाळु कुडके,प्रवीण पंडित इन्सुली मुख्याध्यापक श्री.विनोद गावकर केंद्र प्रमूख मा. लक्ष्मीकांत ठाकुर व शिक्षक वर्ग होते यावेळी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतीमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरवातीस आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रास्ताविकामध्ये मा.गुरुनाथ पेडणेकर यांनी या कार्यक्रमाच्या उद्देश विषयी व आयोजना विषयी माहिती देताना सांगितले की शिक्षक दिनानिमित्त आयोजित या सोहळ्याच्या माध्यमातून हे कार्यक्रम तालुक्यातील प्रत्येक विभागात आयोजित करण्यात येणार आहेत. इन्सुली जि. प. येणा-या केंद्रातील 60 शिक्षकांना गौरविण्यात आले व विशेष सत्कार करण्यात आले. श्री पेडणेकर सर यांनी उपस्थितांना संबोधताना कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील म्हणजे डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार इ.सर्व घटकांचे सत्कार केले गेले. परंतु शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख,शिक्षक यांनी प्रभावीपणे केलेल्या कार्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.म्हणूनच भाजपा यांनी हा सोहळा शिक्षक दिनाचा,सन्मान कोविड योद्यांचा हा योग जुळवून आणला. याचा आपल्याला अत्यंत आनंद होत आहे असेही त्यांनी सांगितले. प्रवीण देसाई, उमेश पेडणेकर, उन्नति धुरी, सभापती मानसी धुरी यांनीही शिक्षक आणि शिष्य यांच्या मधील आदर क्रूनानुबंध याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रूपा शिरसाठ यांनी तर आभार तालुकाध्यक्ष श्री. महेश धुरी यांनी मानले त्यानी जिल्हाध्यक्ष मा .राजनजी तेली साहेबांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजन केला कोविड महामारी च्या काळात शिक्षाकांना देशसेवासाठी केलेल्या कार्यासाठी सलाम केला.

तसेच शिरसाठ यानी एवढे सुंदर सुत्रसंचालन केले की त्यांच्या शब्द सुमनाने शिक्षक वर्ग सुद्धा गहीवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपा पदाधिकारी, सिंधुदुर्ग बँक विद्यमान संचालक व माजी शिक्षण व आरोग्य सभापति व जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कामत साहेब व उन्नति धुरी, मानसी धुरी व इ.कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा