You are currently viewing 9 डिसेंबर रोजी कणकवलीत जिल्ह्यास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन

9 डिसेंबर रोजी कणकवलीत जिल्ह्यास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन

कणकवली :

 

कणकवली येथे दिनांक शनिवार 9 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत महिलांसाठी जिल्ह्यास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही स्पर्धा सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहेत, अशी माहिती बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाच्या संयोजक, कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा सौ.मेघा गांगण यांनी दिली.

या स्पर्धेत बक्षीस पुढील प्रमाणे असून, प्रथम क्रमांक 3000 रुपये, द्वितीय क्रमांक 2000 रुपये, तृतीय क्रमांक 1000 हजार रुपये आणि उत्तेजनार्थ 5 जणांना प्रत्येकी 500 रुपये बक्षिस रूपात देण्यात येणार आहेत.रांगोळीचा विषय – मोदी सरकारने देशात महिलांसाठी ज्या विविध योजना राबविल्या आहेत. त्याचा समावेश असावा अशी अट आहे.अधिक माहितीसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाच्या संयोजक,माजी नगराध्यक्षा सौ.मेघा गांगण यांना 9404448999 संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा