सरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास 26 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेन लिपिक टंकलेखक गट ‘क’ ही पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने 5 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तथापि जास्तीत जास्त उमदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्यासाठी अर्ज भरण्यास 26 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक व पात्र माजी सैनिक (आर्मी, नेव्ही व एअर फोर्स) यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. या भरतीची सविस्तर जाहीरात सूचना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainaik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क साधावा.
