फोंडाघाटमध्ये ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन ठप्प
फोंडाघाट (प्रतिनिधी) –
फोंडाघाट परिसरात आज दुपारी अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बाजारपेठ तसेच मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि घरांच्या परिसरात पाणी साचल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यापाऱ्यांना दुकानांत शिरलेल्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना बाहेर पडणेही अवघड झाले आहे.
अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे फोंडाघाट वासीय त्रस्त झाले असून प्रशासनाने तातडीने पाणी उपसण्याची आणि वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
