You are currently viewing ५ नोव्हेंबरला नारूर येथील श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव

५ नोव्हेंबरला नारूर येथील श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील नारूर येथील श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. ३ दिवसीय असा हा भव्य दिव्य जत्रोत्सव विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. बुधवारी ५ नोव्हेंबरला या जत्रोत्वाला सुरुवात करण्यात येईल. त्यादिवशी पहाटेला ६.०० वा. सामुदायिक प्रार्थना, लघुरुद्र अभिषेक देवीवर करून सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास सालंकृत महापुजा ओटया भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य, महाआरती, महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५.०० वाजता उपदैवतांना दिपदान केलं जाईल त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास त्रिपुरारी वाती पेटवणे, पुराण वाचन, आरती या धार्मिक विधी करून रात्रौ ११.०० वाजता श्री देवी महालक्ष्मीचा पालखी सोहळा साजरा केला जाईल. याचदिवशी रात्रौ १२.०० वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी ८.०० वाजल्यापासून पासून अभिषेक, कुंकूमार्जन, सालंकृत महापुजा, दुपारी १.०० वाजता आरती या धार्मिक विधी पार पडतील त्यानंतर दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास पारंपारीक गोपाळकाला सादर करण्याची वैशिष्ट्य पूर्ण प्रथा केली जाईल.

सायंकाळी ५.०० वाजता देवतळी स्थानासाठी रवाना होतील. सायंकाळी ६.०० वा. श्री. देवी महालक्ष्मीची पालखी उपदैवतांना भेट देईल. रात्रौ १०.०० वाजता लळीत किर्तन होईल.

तिसऱ्या दिवशी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सालंकृत महापुजा, दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य, महाप्रसाद, सायंकाळी ४.०० वाजता या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता केली जाईल.

तरी या जत्रोत्सव सोहळ्याला सर्व भाविकांनी येऊन श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, चार बारा गावकर मंडळी, बहुमानकारी व समस्त नारूर ग्रामस्थ यांच्या वतीन श्री देवी महालक्ष्मी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष दीपक नारकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा