आ. नितेश राणे यांनी भाजपा नेते दिलीप रावराणे व कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन.
वैभववाडी
भाजपा नेत्यांवर वारंवार टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या गावात भाजपचा सरपंच विराजमान झाला आहे. आचिर्णे ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल रावराणे यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. परंतु आ. नितेश राणे व दिलीप रावराणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करत ग्रामपंचायत भाजपकडे राखण्यात यश मिळविले आहे. आचिर्णे सरपंच पदी भाजपाचे रूपेश सदानंद रावराणे हे विराजमान झाले आहेत.
भाजपा व आमदार नितेश राणे यांच्यावर वारंवार टीका करणे हाच अतुल रावराणे यांचा एक कलमी कार्यक्रम राहिला आहे. पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा अतुल रावराणे यांच्या पँनेलचा भाजपाने धुवा उडविला आहे. या निवडणुकीत भाजपचे पाच तर सेनेचे चार सदस्य निवडून आले आहेत. भाजपाच्या झेंड्याखाली ग्रामपंचायत राखल्याबद्दल आ. नितेश राणे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.