*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुणजी वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
__________________________
श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प -४६ वे
श्री स्वामी भ्रमण गाथा..
*****************************************
श्री स्वामी सर्वांना जे बोलले
बहुमोल अर्थ सार त्यातले
घ्यावे समजुनी हो हे सारे
मग होईल कार्य चांगले ।।१ ।।
मठ,आणि संस्था चालवताना
प्रमुखाचे आचरण स्वच्छ असावे
त्याने वैराग्य मनी बाळगावे
वागणे अलिप्तपणे ते असावे ।।२ ।।
लालभारती सहित सर्वांनी
स्वामींचे मार्गदर्शन ऐकिले
नमस्कार करून, सारे मग
राज-दरबारी भेटीस पोंचले ।।३ ।।
या आलेल्या लोकांच्या कडून
स्वामींच्या अलौकिक कार्याबद्दल
मालोजीराजे यांना समजले
ऐकोनि सारे राजे थक्क झाले ।। ४ ।।
***********************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे
____________________________
