You are currently viewing फिजीओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोंदणी करण्याबाबत आवाहन

फिजीओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोंदणी करण्याबाबत आवाहन

कुडाळ :

ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात ‍फिजीओथेरपी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोदणी करणे अनिवार्य आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या संकेत स्थळावर पुढील प्रवेश प्रक्रीयेसाठी ऑनलाईन नोंदणी दिनांक 28/10/2025 ते 30/10/2025 या कालवधीत ‍ करावयाची असून दिनांक 30/10/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्या www.mahacet.org या संकेत स्थळावर भेट द्यावी किंवा बॅ. नाथ पै फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या मोफत मार्गदर्शन कक्षामध्ये संपर्क साधावा (02362-221289, 9423406885,9423447736, 7057276831) असे आवाहन बॅ.नाथ पै फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य श्री.प्रत्युष रंजन बिस्वाल तसेच बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. उमेश गाळवणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा