You are currently viewing वाटसरू

वाटसरू

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वाटसरू*

 

वाटेत चालतांना आले अडथळे

तरी चालत राहिलो तुडवीत काटे

झाले रक्तबंबाळ,तरी पाय मोकळे

करीत ,क्षिती न कुणा काय वाटे

/१/

 

ठरविले मनी होईन वाटसरू मी

येतील किती वादळे अनावधाने

सावरुन त्यातुनि खचित जाईन आवरुन स्वतःलाआत्मविश्वासाने

/२/

 

करांना स्पर्श विषारी काट्यांचा

त्याच करी दिधला गंध फुलांचा

ठेवले न मनी कपट कधी कुणाचे

वाटसरू होताना का राग कुणाचा /३/

 

जखमी मनाच्या वेदना उराशी

ठेचकाळत सोसल्या ऐकल्याने

भळभळत्या जखमा वाहूदिल्या

घाव तेच जपता सावरले जीवाने

/४/

 

एक आस ठेवली झगडेन स्वतःशी

परि अंतिम क्षणी ध्येय गाठेन मी

येवोत किती आवर्तने त्या गर्तेत

वाटसरू होऊन मार्ग दावेन मी.

/५/

 

स्वरचित स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा