..अन्यथा उपोषण : हेवाळे मुळस बांबर्डे वासीयांचा इशारा…

..अन्यथा उपोषण : हेवाळे मुळस बांबर्डे वासीयांचा इशारा…

मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन

दोडामार्ग प्रतिनिधी
हेवाळे बांबर्डे खराडी नाल्यावरील कॉजवे हा कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात सतत पाण्याखाली असतो व या कॉजवेवरुन ये-जा करताना हेवाळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. येत्या पावसात तर हा कॉजवे वाहून गेलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त उंचीचा पूल बांधावा अन्यथा ग्रामस्थांसह याच कॉजवेवर उपोषण केले जाईल अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो व जयवंत देसाई यांनी ग्रामस्थानसह दिले आहे.

या निवेदनात, या कॉजवेवर पावसाळ्यात पाणी आल्याने जीवित हानीही झालेली असून गेल्या ३० वर्षांपासून वारंवार मागणी करुनसुध्दा या कॉजवेची उंची अद्याप वाढवण्यात आलेली नाही. या कॉजवेमुळे लगतचे शेतकरी पास्कू लोबो व जॉनी फर्नाडीस यांचे मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. तसेच या कॉजवेला प्रस्तावित असलेल्या नाबार्ड अंतर्गत मंजुरी मिळालेली असून नव्याने बांधण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. चालु पावसाळयात हेवाळे बांबई कॉजवे ब्रिज पूर्णतः वाहुन गेलेले असून त्यावरुन ये-जा करणे धोकादायक बनलेले आहे. त्यासाठी दुरुस्ती न करता नव्याने कॉजवेसाठी निधी उपलब्ध करुन कोरोना महामारी अनलॉक संपल्यानंतर तातडीने काम हाती घेण्यात यावे. तसेच या निवेदनाची दखल घेऊन दि. ११ सप्टेंबर २०२० पर्यंत निधी उपलब्ध केल्याचे लेखी पत्र आम्हांस दयावे अन्यथा १६ सप्टेंबर २०२० पासून आम्ही व ग्रामस्थ हेवाळे बांबई कॉजवे वर आमरण उपोषण करू असे म्हटले आहे. हे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुखव प स सदस्य बाबुराव धुरी यांच्याकडे देण्यात आले असून त्यांनी ते पालकमंत्री, खासदार व आमदार यांसह संबधित विभागाला पाठवल्याचे यावेळी धुरी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा