स्व. प्रकाशजी परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त तळवडेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
तळवडे (प्रतिनिधी) –
स्व. प्रकाशजी परब यांच्या सातव्या परमपवित्र स्मृतिदिनानिमित्त येत्या शुक्रवारी, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी तळवडे गेट येथील प्रकाश परब संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रकाश परब मित्रमंडळ, श्री सिद्धेश्वर ग्रामोत्कर्ष मंडळ तळवडे, तळवडे अर्बन बँक, शिवरामभाऊ जाधव सेवाश्रम, तळवडे विकास सोसायटी, रोटरी क्लब तळवडे आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

