You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच​ पदाची ​निवड उद्या

वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच​ पदाची ​निवड उद्या

वैभववाडीत सरपंच पदासाठी होणार चुरस

वैभववाडीः

वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरुवारी निवडणूक होत आहे.सरपंच व उपसरपंच पदासाठी अनेक ठिकाणी ​रस्सीखेच होणार असून सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत तालुक्यात ​उत्सुकता आहे.
तालुक्यातील ऐनारी, भुईबावडा, मांगवली, वेंगसर, सोनाळी, कुंभवडे, नाधवडे, कोकिसरे, खांबाळे, आचिर्णे, लोरे, सांगुळवाडी यापैकी मांगवली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती.तर उर्वरित १२ ग्रामपंचायतीसाठी १५.जानेवारी निवडणूक प्रक्रीया पार पडली होती.या १३ पैकी .९ ग्रामपंचायतीवर भाजपने बहुमत मिळवले आहे.तर ४.ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे बहुमत आहे.असे असले तरी गुरुवारी सरपंच निवडणूकी पर्यंत काहीही घडू शकते.प्रत्यक्ष सरपंच निवडीत कोण बाजी मारतो हे महत्वाचे ठरणार आहे.त्यादृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.दरम्यान २८.जानेवारीला सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे.त्यानुसार खुल्या प्रर्वगासाठी भुईबावडा, मांगवली,कोकिसरे, आचिर्णे या चार ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून याठिकाणी मोठी रश्शीखेच होण्याची शक्यता आहे.तर सर्वसाधारण महीलांसाठी नाधवडे, ऐनारी, सांगुळवाडी व खांबाळे या चार ग्रामपंचायतीत रश्शीखेच होऊ शकते.ना मा प्र सर्वसाधारण लोरे, कुंभवडे, या दोन ग्रामपंचायती असून कुंभवडे ग्रामपंचायतीवर ​सेनेचे पॕनल विजयी झाले आहे.माञ त्यांच्याकडे नामाप्र पुरुष नसल्यामुळे याठिकाणी भाजपच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे.तर लोरे ग्रामपंचायत शिवसेनेकडेच राहाणार आहे.तर वेंगसर नामप्र महिलेसाठी राखीव आहे.सोनाळी ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण अनु.जाती महिलासाठी राखीव पडले आहे.तर एडगाव ग्रामपंचायत सरपंच अनु.जाती साठी राखीव पडले आहे.त्यामुळे उदया होणाऱ्या निवडणूकीत कोणाकोणाच्या गळ्यात सरपंच व उपसरपंचचाची माळ पडणार तसेच सरपंच निवडीत भाजप शिवसेनेचा सरपंच बसणार हे उदया स्पष्ट होणार आहे.या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =