You are currently viewing पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप;

पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप;

“पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप;

सावंतवाडीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था’तर्फे प्रेरणादायी उपक्रम”

सावंतवाडी
सावंतवाडी येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था’च्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे युवाध्यक्ष विक्रांत सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सीताराम गावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. भक्ती गांवस-तावडे, साईश गावडे, चैताली गावडे आणि रेश्मा पालव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रुपेश पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी आणि आभार प्रदर्शन भूषण सावंत यांनी केले.

हा उपक्रम पत्रकारितेतील सामाजिक भान आणि बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा