मुंबई :
झारापचे सुपुत्र श्री.लक्ष्मण कुशा पाटकर यांना राष्ट्रीय एकता सन्मान महासोहळ्यात लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या वतीने “राष्ट्रीय प्राऊड लिडरशीप आयकॉन” पुरस्काराने (साहित्य क्षेत्रात) सन्मानित करण्यात आले. सेंट्रल एक्साईजचे माजी सहा.आयुक्त सुधाकर पाटील, मान. रामचंद्र नागरगोजे, सहा.पोलिस आयुक्त मुंबई, लेफ्ट. कमांडर निलेश झोपे यांच्या हस्ते सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री.लक्ष्मण पाटकर यांना यापूर्वी मुंबईतील सर्वद फॉऊंडेशनच्या वतीने सर्वोत्कृष्ट साहित्यिक या पुरस्कारासह इतर सामाजिक संस्थेच्यावतीने विविध पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
श्री.पाटकर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत उप अधीक्षक या पदावर कार्यरत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामाकडे हे केवळ नोकरी म्हणून पहात नसून सामाजिक जाणीव आणि भान ठेवून समाजात अडलेल्या नडलेल्यांच्या मदतीला वेळोवेळी धावून जातात. त्यांच्याकडे कामासाठी आलेली प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊनच जातो. समाजात जगत असताना ते नेहमी नितिमूल्यांची जोपासना, सामाजिक कर्तव्य आणि आदरातिथ्य या तीन तत्वांचा अवलंब करून आनंदी आयुष्य जगत असतात.
