You are currently viewing प्लॕस्टिकमुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रमात वैभववाडी महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग….

प्लॕस्टिकमुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रमात वैभववाडी महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग….

वैभवावाडी

देशाचा मानबिंदू आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेला मालवणचा ऐतिहासिक जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला होय.
या किल्ल्यावर दररोज हजारो पर्यटक येतात. किल्ल्यावर कचरा व्यवस्थापनाची सोय नसल्यामुळे इतर कच-यासह प्लॕस्टिक कच-याने किल्ल्याचे सौदंर्य नष्ट होत चालले आहे. ही गोष्ट काही शिवप्रेमीच्या लक्षात आल्यानंतर विचारविनिमय होऊन जिल्ह्यातील शिवप्रेमी व समविचारी संस्थाच्या सहकार्याने माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेने संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करुन
“प्लॕस्टिकमुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रम” करण्याची परवानगी घेतली.


माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, कोकण इतिहास परिषद शाखा सिंधुदुर्ग, शिवप्रेमी सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग अॕडव्हेंचर, यशवंतगड शिवप्रेमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ७ फेब्रुवारी,२०२१ रोजी एक दिवसीय “प्लॅस्टिकमुक्त सिंधुदुर्ग किल्ला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १९ फेब्रुवारी या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर “प्लॕस्टिकमुक्त सिंधुदुर्ग किल्ला” या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करुन छ.शिवाजी महाराजांना मानवंदना दिल्याची भावना शिवप्रेमींकडून व्यक्त होत होती. या कार्यक्रमामध्ये जिल्हाभरातून विविध संस्थांचे पदाधिकारी, शासनाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मिळून जवळजवळ १७५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विद्यार्थी इतिहास विभाग प्रमुख प्रा.श्री.एस.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय सहभागी झाले होते. त्यामध्ये कु.सुरज पाटील, कु. आकांक्षा इंदुलकर, कु.माधुरी पालकर, कू.श्रृती धनावडे व कु.प्रणिता साळुंखे सहभागी झाले होते.


यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिर, महादेव मंदिर, वस्तुसंग्रहालय, मालवण बिच आणि तारकर्ली बिच येथे विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. यासाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =