*गरजू दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप*
सिंधुदुर्ग
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी पॅलिएटिव केअर डे या दिनाचे औचित्य साधून सामान्य रुग्णालयाच्या आवारामध्ये गरजू दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यावेळी डॉ. तुषार चिपळूणकर (Additional सिविल सर्जन), श्रीधर पवार सर, कांबळे सर, कौन्सिलर अंजली वालावलकर मॅडम,जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर, सार्वजनिक आरोग्य विभाग व त्यांचे कर्मचारी, दीपक कापसे सर, दळवी मॅडम, कासले मॅडम आदी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमामध्ये तेजस जंगले, गौरव पांचाळ, अक्षय गोसावी, तन्वी बांदेलकर, व सोहम होळकर या पाच दिव्यांग बांधवांना एम आर किट देण्यात आले. सत्यवान गोळवणकर व यश येडगे या दोन दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर देण्यात आले.राघोबा आजगावकर व महादेव परब या दोन दिव्यांग बांधवांना कानाची मशीन देण्यात आली. रामदेव गुरव या दिव्यांग बांधवांला काठी देण्यात आली. त्यानंतर डॉ. चिपळूणकर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन शुभेच्छा व मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व पुनर्वसन केंद्राची माहिती दिली. कांबळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले
