You are currently viewing मडुरा येथे रेल्वेची धडक बसून ‘बेडूक भाई’ दीपक पाटकर यांचा मृत्यू

मडुरा येथे रेल्वेची धडक बसून ‘बेडूक भाई’ दीपक पाटकर यांचा मृत्यू

सावंतवाडी:

मडुरा येथे रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील युवक दीपक पाटकर उर्फ ‘बेडूक भाई’ याचे येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

मडूरा येथील ग्रामस्थांनी याबाबतची माहिती त्याचे सहकारी मित्र राजू धारपवार यांना दिली. यानंतर घटनास्थळी त्यांनी धाव घेतली. रेल्वेच्या धडकेत त्याचे जागीच निधन झाले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह आणण्यात आला. सोशल मिडियावर ‘बेडूक भाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दीपक पाटकर चे अकाली निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा