You are currently viewing सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण; राजकीय वातावरणात हलचल

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण; राजकीय वातावरणात हलचल

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाले आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या सोडत प्रक्रियेनंतर ही माहिती जाहीर झाली असून, त्यामुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले आहे.

यापूर्वी या नगरपरिषदेत सौ. पल्लवी केसरकर यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. आता पुन्हा महिला प्रवर्गाचे आरक्षण लागल्याने अनेक नवीन तसेच अनुभवी महिला चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण या पदासाठी आपली दावेदारी सादर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या आरक्षण सोडतीनंतर सावंतवाडीत निवडणुकीचा माहोल रंगू लागला असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार हे निश्चित झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा