You are currently viewing गणित संबोध परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीचे यश

गणित संबोध परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीचे यश

*गणित संबोध परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीचे यश*

सावंतवाडी

महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले. स्कूल मधून इयत्ता आठवीतील प्रविष्ट झालेल्या पंचवीस विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांनी 75 पेक्षा अधिक गुण मिळविले तर 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन गणित विषयातील प्राविण्य सिद्ध केले. सदर स्पर्धा परीक्षेसाठी श्री अरुण गावडे सर यांनी यांनी मार्गदर्शन केले. सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी जिल्हास्तरावर होणाऱ्या गणित प्राविण्य परीक्षेत पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक श्री अरुण गावडे सर यांचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे, सर्व संचालक यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि प्राविण्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा