वेेंगुर्ले
भाजपा महिला मोर्चा च्या वतीने व सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सह.संस्थेच्या सहकार्याने वेंगुर्लेत महीलांसाठी मोफत गोड्या पाण्यातील माशांपासुन विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
भाजपाचे सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती कृषी व मस्त्यपर्यटन सह.संस्थेच्या वतीने दिनांक १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान सावंतवाडीत जनरल जगंन्नाथराव भोसले शिव ऊद्यान येथे मत्स्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या मत्स्य महोत्सव निमित्ताने गोड्या पाण्यातील माशांचे प्रदर्शन, मत्स्य खाद्य जत्रा, शोभिवंत माशांचे प्रदर्शन व विक्री, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती, जिवंत मत्स्य विक्री केंद्र, मस्त्य व्यवसाय मार्गदर्शन, मत्स्य पाककला स्पर्धा इत्यादीचे आयोजन केले आहे.
या मत्स्य महोत्सवात गोड्या पाण्यातील माशांची ओळख व्हावी व त्या गोड्या पाण्यातील माशांची चव चाखता यावी यासाठी महिलांसाठी खास गोड्या पाण्यातील माशांपासुन विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण वेंगुर्ले येथील साईमंगल कार्यालय येथे शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १ या कालावधीत आयोजित केले आहे. सदर प्रशिक्षण हे मस्त्य महाविद्यालय शिरगाव, जिल्हा – रत्नागिरी या मस्त्य विद्यालयाचे डाॅ. आशिष मोहीते, डाॅ.डाबीर पठाण व प्रोफेसर एस्. टी.सारंगधर हे प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरामध्ये गोड्या पाण्यातील माशांपासुन कटलेट, कोळंबी लोणचे, फीश क्रीस्पी, फीश बाॅल्स् व विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे .
भाजपा महिला मोर्चा महिलांना आत्मनिर्भर बनविण्याकरीता यापूर्वीही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील महिला बचत गटांना सेलम जातीचे हळदीचे १५ हजार कीलोचे बियाणे वाटप केले, तसेच मोफत खतही वितरीत करण्यात आले. तसेच महीला भगिनींना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या मार्फत शिलाई मशीन व सायकल देण्यात आल्या.
या पाककला प्रशिक्षण शिबिराचा वेंगुर्ले तालुक्यातील महीलांनी सहभागी होऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांनी केले आहे.
भाजपा महिला मोर्चा च्या वतीने महीलांसाठी मोफत प्रशिक्षणाची माहिती देताना महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले, प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर, नगरसेविका शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेविका क्रुपा मोंडकर, हसीना बेन मकानदार आदी उपस्थित होते.