You are currently viewing सावंतवाडीत उद्या २ वेळा वाजणार भोंगा

सावंतवाडीत उद्या २ वेळा वाजणार भोंगा

सावंतवाडीत उद्या २ वेळा वाजणार भोंगा

पालिकेतर्फे उद्या अनोख्या पद्धतीने हुतात्म्यांना आदरांजली

सावंतवाडी

येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून उद्या दिनांक ३० जानेवारीला अनोख्या पध्दतीने हुतात्मा दिन साजरा करण्यात येणार आहे.यावेळी तब्बल २ वेळा भोंगा वाजून अनोख्या पद्धतीने आदरांजली देण्यात येणार आहे. यात सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी पहिला भोंगा होईल.त्यानंतर सर्व नागरिकांनी उभे असलेल्या जागेवर राहुन आदरांजली वहावी. त्यानंतर पुन्हा ११ वाजता दुसरा भोंगा देण्यात येईल. त्यावेळी सर्वांनी आपले काम सुरू करावे , असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा