*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
___________________________
श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प- ४३ वे
श्री स्वामी भ्रमणगाथा ..
___________________________
श्री स्वामींच्या भ्रमणगाथेत एक राजूर गाव आहे । जे बीड जिल्ह्यात आहे । भारती संप्रदायाचा मठ ” अशी ज्याची ओळख आहे ।श्री स्वामींचे होते वास्तव्य याच मठात ।।१।।
चंचलभारती”हे स्वामींचे संबोधन होते । हे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले होते । दर्शनास झुंडीने भक्त येत होते। याच मठात ।।२।।
इथल्या लोकभारती” प्रमुख शिष्याने खटपट केली ।
निजमापर्यंत जाऊन कारवाई केली । निजामाकडून ब्रह्मान्ड नायकांच्या नावाने आठ गावांची सनद प्राप्त केली ।
यामुळे मठाची परिस्थिती सुधारली ।।३।।
एकदा राजूरकर मंडळी पंढरपुरी गेली । पावसाने भीमा नदी
भरून गेलेली । तीरावर भक्त मंडळी थांबली । पैलतीरी जाण्यासाठी ।।४ ।।
वारकऱ्यांनी थक्क करणारे दृश्य पाहिले । एक यती मूर्ती
जलपृष्ठावरून चालत येतांना दिसले। राजूरकरांना हेच यती
चंचलभारती दिसले । त्यांना विचारले स्वामी,इकडे कसे आले ? ।।५ ।।
जेंव्हा राजूरला सारे परतले । स्वामींना पंढरपुरी आम्ही स्वामींना पाहिले । वृत्त सर्वांना सांगितले ।।६।।
मठातील लोक म्हणाले । तुम्हाला असेच आहे वाटले ।
स्वामी तर मठ सोडून कुठेच नाही गेले । आमच्या सोबतच आहेत ते तर ।। ७ ।।
***********************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे पुणे
___________________________

