You are currently viewing श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालवण :

 

कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात कांदळगाव लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे १२ व १३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त १२ रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर चरणी लघुरुद्र, दुपारी १२ वा. महाआरती, १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत खुर्ची, रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स, मिमिक्री व नाट्यछटा, १३ रोजी रात्री ९.३० वा. डबलबारी भजन सामना दत्तगुरू भजन मंडळ, कासार्डेचे बुवा उदय पारकर, व पावणादेवी भजन मंडळ फोंडाघाटचे बुवा हेमंत तेली यांच्यात होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा