रत्नागिरी :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इस्टिट्यूट, (BKVTI), रत्नागिरी तर्फे “”शक्तिरूप” या नाविन्यपूर्ण मॉडेल ड्रेसिंग अँड मेकअप कार्यक्रमाचे” आयोजन बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी BKVTI मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आले होते.
“शक्तिरूप” या नाविन्यपूर्ण मॉडेल ड्रेसिंग अँड मेकअप कार्यक्रमामध्ये महिलांच्या सौंदर्यशास्त्र, आत्मभान आणि सर्जनशीलता यांचा अनोखा मिलाफ या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचे आयोजन बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इस्टिट्यूट, (BKVTI), यांच्या वतीने करण्यात आले होते, यात मुली व महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे व त्यांच्यातील आत्मविश्वासाला बळकटी देणे. हा या कार्यक्रमाचा उद्धेश होता.
कार्यक्रमामध्ये विविध वयोगटांतील महिला व मुली सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक, फ्युजन आणि मॉडर्न अशा विविध थीम्सवर आधारित ड्रेसिंग सादर करण्यात आले. त्याचबरोबर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट् व ब्युटी अँड वेलनेस विभागाच्या सौ. सिद्धी सावंत यांनी साकारलेले अद्भुत मेकअप लुक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
मुख्य आकर्षण म्हणजे फॅशन डिझायनर कु. प्रितम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मुलीनी “शक्तिरूप” या संकल्पनेशी सुसंगत पोशाख तयार करून त्याद्वारे एका सामाजिक संदेशाची मांडणी केली. यावेळी “शक्तिरूप” हा केवळ कार्यक्रम नसून, एक प्रेरणा आहे. असे मत अकॅडमीक कॉर्डिनेटर कु. साधना ठाकूर यांनी व्यक्त केले.

