You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठीच्या बसचे लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठीच्या बसचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी :

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार व मान्यतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तसेच आंतरवासियता प्रशिक्षणार्थी (इंटर्न डाॅक्टर्स) यांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठी ४४ आसनी बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. या बसचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ डवंगे, पीएम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा