You are currently viewing भाजपा पडेल मंडल आयोजित शिबिरात १५६ दात्यांचे रक्तदान

भाजपा पडेल मंडल आयोजित शिबिरात १५६ दात्यांचे रक्तदान

भाजपा पडेल मंडल आयोजित शिबिरात १५६ दात्यांचे रक्तदान*

देवगड –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृतमोहत्सवी वाढदिवस व प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १५६ दात्यांनी रक्तदान केले. भाजपच्या वतीने देशभर सेवा पंधरावडा साजरा केला जात आहे, या अंतर्गत पडेल मंडलाच्या वतीने फणसगाव आरोग्य केंद्र येथे आयोजित केलेल्या शिबिराचा शुभारंभ पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले
या रक्तदान शिबिरास मंडल अध्यक्ष महेश ( बंड्या )नारकर, रवी पाळेकर, अमोल तेली,रामकृष्ण राणे, संजय बोंबडी, संजना आळवे, अंकुश ठुकरूल,रामकृष्ण जुवाटकर, संजय लाड, भूषण पोकळे, प्रवीण पासठे, विश्वनाथ खानविलकर, संतोष चव्हाण, कृष्णा नर, राजन लाड, सादिक डोंगरकर, दीपक परब हे भाजपा पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा साजरा करण्याची कल्पना पडेल मंडलाने प्रत्यक्षत साकार केली त्याचाच भाग म्हणून मागील आठवड्यात किल्ले विजयदुर्ग येथील स्वच्छता अभियान व आज १५६ दात्यांनी रक्तदान करून मोदींच्या कार्याला सलाम केला
या रक्तदान शिबिराच्या आयोजनात लाईफ टाइम हॉस्पिटल रक्तपेढी व फणसगाव आरोग्य केंद्र कर्मचारी व तंत्रज्ज्ञ यांचे सहकार्य लाभले या सर्वांचे मनःपूर्वक आभार अध्यक्ष बंड्या नारकर यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा