You are currently viewing उड्डाणपूल वाहतूक रोखली; शिवसेना उतरली रस्त्यावर…

उड्डाणपूल वाहतूक रोखली; शिवसेना उतरली रस्त्यावर…

संदेश पारकर झाले आक्रमक

कणकवली

कणकवली शहरातील हायवे उड्डाणपुलावरील सुरू झालेली वाहतूक शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रोखली. हायवे चौपदरीकरण संदर्भात शहरवासीयांच्या १८ मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. वामन हरी पेठे समोरील भराव कोसळलेल्या बॉक्सेलच्या भिंतीची पुनर्बांधणी न करताच तात्पुरती डागडुजी केली आहे. याबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर २०२० रोजी धोकादायक बॉक्सेल भिंतीचे बांधकाम पाडून नव्याने बांधकाम करण्याचे आदेश दिले होते. मात्र उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हायवे ठेकेदाराने डागडुजी ची मलमपट्टी करून उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू केली आहे.

हायवे ठेकेदाराच्या मनमानिविरोधात अखेर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत उड्डाणपुलावरील वाहतूक रोखली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, ऍड. हर्षद गावडे, वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर, बाळू मेस्त्री, भास्कर राणे, राजू राणे, ललित घाडीगांवकर, महेश कोदे, पराग म्हापसेकर, गौरव हर्णे, राजू साटीलकर , रामदास मांजरेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =