भाजपची सत्ता असल्याने नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्याचा ठराव

भाजपची सत्ता असल्याने नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्याचा ठराव

कोकणातील बहुचर्चित नाणार रिफ़ायनरि प्रकल्पाला कणकवली नगरपंचायत सभेत पाठिंबा….

कणकवली / प्रतिनिधी :-

नगराध्यक्ष समीर नलावडे यांंनी दिलेल्या माहिती नुसार
कोकणातील सुमारे दीड लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला कणकवली नगरपंचायतिनेही पाठिंबा द्यावा अशा आशयाचा ठराव विडीओ कॉन्फ्रेंरंसद्वारे झालेल्या कणकवली नगरपंचायतच्या सभेत नगरसेवक शिशिर परूळेकर यांनी मांडला होता.

या ठरावाला उपस्थित सार्वांचाच पाठिंबा मिळाल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. नगराध्यक्ष नलावडे यांच्या उपस्थितित कणकवली नगरपंचायतची सभा पार पडली. या सभेला नगरसेवक बंडू हर्णे, अभी मुसळे, संजय कामतेकर, शिशिर परूळेकर, शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक, राष्ट्रवादी चे नगरसेवक अबिद नाइक, आदि नगरसेवक सहभागी झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ही सभा वीडियो कॉन्फ्रेंरंसद्वारे घेण्यात आली. कोकणात गेल्या दोन वर्षांपासुन आजि माजि सत्ताधारी आणि विरोधकांमधे रणकंदन सुरु आहे. नाणार प्रकल्प होण्याबाबत भाजप आग्रही असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन पाठिंब्याबाबत ठराव घेतले जात आहेत. कणकवली नगरपंचायतवर भाजपची सत्ता असल्याने या सभेत नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्याचा ठराव प्रामुख्याने घेण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा