*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित पुस्तक परिचय*
*पुस्तक — योद्धा कर्मयोगी: एकनाथ संभाजी शिंदे*
*योद्धा कर्मयोगी: एकनाथ शिंदे यांचे जीवन आणि राजकीय प्रवास मांडणारे पुस्तक*
मला वाचनाची अत्यंत आवड असल्याने कोणतेही नवीन पुस्तक सहज उपलब्ध होते…
महाराष्ट्राचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आजवरच्या जीवन वाटचालीचा वेध घेणारे मा. डाॅ. प्रा. प्रदीप ढवळ, अरुंधती भालेराव लिखित ‘”योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’” हे चरित्रपर पुस्तक माझ्या वाचनात आले.. हे पुस्तक म्हणजे एक रिक्षाचालक ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास… प्रेरणादायी आणि संघर्षाची कहाणी याचे दर्शन घडवणारा…
मा. श्री एकनाथजी शिंदे यांचा जीवन प्रवास या चरित्र ग्रंथातून मांडण्यात आला आहे तसेच त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा लेखकांनी या ग्रंथात मांडला आहे… दिवसा जो स्वप्न पाहतो त्याचे स्वप्न खरे होतात असे म्हणत लेखकांनी मा. श्री. एकनाथजी शिंदें यांचा परिचय या पुस्तकातून करुन दिला आहे… त्यांची संयमी वृत्ती, लोकांचे ऐकून घेण्याची प्रवृत्ती, कठोर मेहनतीची
तयारी, विविध पदांना न्याय देण्याची वृत्ती हे त्यांचे गुणविशेष, जनतेत राहून जनतेसाठी काम करणे, संघर्षाला शांतपणे तोंड देण्याची वृत्ती, मित्रांप्रती कर्तव्य हेही त्यांचे गुणविशेष, यांच्या जीवनातील विविध घटना, प्रसंग या चरित्रग्रंथातून लेखकांनी मांडल्या आहेत… लेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे पुस्तकाचे नायक श्री एकनाथजी शिंदे यांचे अनेक वर्षांपासूनचे स्नेही आहेत म्हणूनच हे चरित्रात्मक पुस्तक वाचकाला श्री एकनाथजी शिंदे यांचे अधिकृत वर्णन देते.
मा.श्री. एकनाथजी शिंदे हे लोकांमध्ये रमणारे व्यक्तिमत्त्व… त्यांच्या स्वभावातला आणखी एक पैलू म्हणजे निर्णयक्षमता.. आपल्या राजकीय जीवनात आलेल्या विविध कठीण प्रसंगांना आपली तत्त्वे ढळू न देता घेतलेले कठोर निर्णय आणि त्याची अंमलबजावणी हे एकनाथजी शिंदे यांच्यामधील हे गुण ठळकपणे अधोरेखित करतात आणि त्यांना खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा नायक बनवतात…
खडतर परिस्थितीतून मुंबईला आल्यानंतर सुरुवातीला छोट्याश्या घरात राहणारे आणि वर्षा बंगल्यावर राहायला जाणारे…आयुष्याच्या वळणावर जीवनात आलेल्या अनेक संकटांवर मात करत त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करणारे व संवेदनशील नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले मात्र राज्याच्या राजकारणात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मोठी उलथापालथ झाल्याचं देशाने पाहिले त्यामुळे कणखर आणि डॅशिंग नेता म्हणूनही ओळख निर्माण झालेले मा. श्री एकनाथजी शिंदे
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ठाण्यामधील शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा त्यांच्या मेहनतीचा भाग… एक कट्टर शिवसैनिक आणि धाडसी नेता तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्षाला सकारात्मकरित्या हाताळून परिस्थितीचा केलेला सामना हे वाचताना जाणवतं तसेच हे पुस्तक वाचताना त्यांच्या आई-वडिलांनी दिलेले संस्कारही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येतात…त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्षाला सकारात्मकरित्या हाताळून परिस्थितीचा केलेला सामना, त्यांचा जीवन प्रवास लेखकांनी उलगडत नेला आहे…
आयुष्याच्या एका टप्प्यावर ते राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात आले. स्वतःपुरते न जगता समाजाकरीता जगण्याचा बहुमोल सल्ला आनंद दिघे साहेबांनी दिल्यानंतर समाजसेवेकरीता बाहेर पडलेल्या शिंदे साहेबांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि देव, देश व धर्माची लढाई लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्राचा परिणाम आपल्याला शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वात वाचताना पाहायला मिळतो.
जनतेत राहून जनतेसाठी काम करणारे नेतृत्त्व किती अडचणीतून तयार झाले हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे… चित्रपटाच्या पडद्या पलीकडच्या अनेक गोष्टी आपल्याला या पुस्तकातून जाणून घ्यायला मिळतील त्याचबरोबर एक कट्टर शिवसैनिक आणि धाडसी नेता या पुस्तकातून वाचताना दिसून येतो…
या पुस्तकाला
आपणा सर्वांचे आवडते ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उर्फ मधुभाई यांचे गौरवोद्गार लाभले आहेत..
मा.श्री एकनाथजी शिंदे यांच्यावरील हे चरित्रपर पुस्तक हे केवळ सार्वजनिक सेवेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठीच प्रेरणादायी नाही तर सर्व वयोगटातील लोकांसाठी देखील प्रेरणादायी आहे.
“योद्धा कर्मयोगी'” या संपूर्ण पुस्तकात शिंदे साहेबांचा जीवन प्रवास आपल्याला वाचावयास मिळतो.
मला विशेष आनंद होत आहे की हे पुस्तक मला प्रदीप सरांनी भेट दिले…
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी
ठाणे@
9870451020
