You are currently viewing काल झालेल्या कराड जवळील वहागाव गावात कार अपघातातील मयत वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, वैभववाडी तालुक्यातील
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

काल झालेल्या कराड जवळील वहागाव गावात कार अपघातातील मयत वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, वैभववाडी तालुक्यातील

कणकवली

आशियाई महामार्गावर भीषण अपघात झालेली स्विफ्ट डिझायर कार ही आरटीओ रजिस्ट्रेशन ऍप नुसार अमित मोरये रा. आंदूरले, ता.कुडाळ यांच्या मालकीची असून अपघातातील चारही मयत हे, वेंगुर्ले, कुडाळ , मालवण, वैभववाडी तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. लग्नासाठी स्विफ्ट डिझायर कारमधून ५ जण पुण्याला निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला कारची धडक बसून हा अपघात घडला. यात निलेश चिंतामणी मोंडकर, रा. खवणे ता. वेंगुर्ला, मनोज मनोहर परब रा. बाव, ता. कुडाळ, अंकुश देवबा शिंदे रा. कुंभभारभाट, मालवण, भरत महाळू बोडेकर रा. वैभववाडी- हे मयत झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =