You are currently viewing धरतीचे ओलेपण

धरतीचे ओलेपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*धरतीचे ओलेपण*

 

नभातून कोसळल्या सरी, भिजली सारी धरा,

थेंबांनी सजली कळी, खुलली वधू वसुंधरा

 

गंधाळली माती सारी , दाटे सुगंध मनात,

फुलारली पिके सारी, जीवन अनमोल फुलात

 

शिवारात उभ्या रांगा, पिकांच्या लहरी झाल्या,

कणसांच्या सोनसळी जणू माळा त्या रूळल्या

 

नद्या ओसंडून वाहती, डोंगरातून‌ निनादे स्वर,

धरतीचे ओलेपण गाते, नवजीवनाचा गजर।

 

लतावल्लरी रानपक्षी , गाऊ लागले सुरेल गान,

धरतीच्या या ओलाव्याने, खुलला जीवनप्राण

 

सरी गेल्या थांबल्या, उजळे नव प्रभात,

धरतीच्या ओलाव्याने, फुलली नव्याने पहाट

 

©️®️ डॉ सौ. मानसी पाटील

मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा