You are currently viewing महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या विद्यार्थिनींचे युवा महोत्सवामध्ये भरघोस यश-

महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या विद्यार्थिनींचे युवा महोत्सवामध्ये भरघोस यश-

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या विद्यार्थिनींचे युवा महोत्सवामध्ये भरघोस यश-*

रत्नागिरी

तिटवे, कोल्हापूर येथे 12 आणि 13 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या विभागीय युवा महोत्सव मध्ये महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी विविध कलात्मक , साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भरघोस यश संपादन केले.
या युवा महोत्सव मध्ये वेस्ट झोन मधून 14 महाविद्यालय सहभागी झाली होती. महर्षी कर्वे महाविद्यालय रत्नागिरीच्या 38 विद्यार्थिनी या फेरीसाठी सहभागी होऊन त्यांनी भरगोस यश प्राप्त केले. डान्स (लोक नृत्य) या इव्हेंटला द्वितीय क्रमांक, थेएटर इव्हेंट मधील एकांकिका तृतीय क्रमांक, स्कीट द्वितीय क्रमांक ,पथनाट्य द्वितीय क्रमांक ,माईम- उत्तेजनार्थ, वक्तृत्व हिंदी मध्ये तृतीय क्रमांक- सफा काझी, निबंध इंग्रजीमध्ये तृतीय क्रमांक- मीरा सुर्वे, वादविवाद हिंदीमध्ये उत्तेजनार्थ- करुणा जाधव आणि तीर्था लिंगायत यांना बक्षीस मिळाले.
त्याचबरोबर फाईन आर्ट मध्ये ऑन द स्पॉट पेंटिंग प्रथम क्रमांक- इशिका बाईंग, उत्तेजनार्थ -आर्या जाधव कार्टूनिंग मध्ये उत्तेजनार्थ -आर्या जाधव , कोलाज प्रथम क्रमांक- इशिका बाईंग, उत्तेजनार्थ- तन्वी जडयार, रांगोळी मध्ये द्वितीय क्रमांक- वेदिका विलणकर ,उत्तेजनार्थ- अमृता माने, क्ले मॉडेलिंग मध्ये -प्रथम क्रमांक युसरा सय्यद , तृतीय क्रमांक सानिका कदम, उत्तेजनार्थ- आयेशा मुल्ला यांनी बक्षीसे मिळविली . फाईन आर्टची चॅम्पियनशिप महाविद्यालयास मिळाली.
या सर्व कामगिरीमुळे महर्षी कर्वे च्या विद्यार्थिनींनी आपल्या कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील बहुमुखी प्रतिमेचा ठसा उमटवत युवा महोत्सवात कॉलेजचे नाव उज्वल केले आहे.
सर्व विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतिभा लोंढे तसेच थेएटरसाठी मयूर साळवी श्रेयश माईन, साहिल चरकरी व नृत्य दिग्दर्शक म्हणून रुपेश धाडवे यांचे मार्गदर्शन लाभले. प्र.प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, रत्नागिरी प्रकल्पाचे अध्यक्षा विद्याताई कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, व अन्य पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थिंनींचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा