अपघातात तीन जणांचा मृत्यु, तर एक गंभीर जखमी

अपघातात तीन जणांचा मृत्यु, तर एक गंभीर जखमी

कणकवली तालुक्यातील जानवली येथील घटना

कणकवली / प्रतिनिधी :-

सध्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम चालू आहे. आशातच आज कणकवली तालुक्यातील जानवली कृष्ण नगरी येथे दोन मोटर साइकल स्वारांची एकमेकाना जोरदार धड़क बसली. या अपघातात तीन जणांचा मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी आहे. यातील दोघेजण भुदरगड तालुक्यतिल आदमापुर येथील आहेत तर दोगेजण राजापुर तालुक्यतिल् पाचल येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

आज शनिवार दिनाक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता हा अपघात जानवली कृष्ण नगरी येथे घडला. यात सताप्पा शिवाजी पाटिल वय 26 , अजय हिम्मतराव पाटिल वय 20 दोघेही पुर हे एका ग।डीवर् होते तर दुसर्या गाड़ी वरील अस्लम कलोट राहणार पाचल राजापुर या तिघानचा मृत्यु झाला. तर आश्रफ प्रफुलकर हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार शुरू आहेत.

दोन्ही मोटर साइकिल चे झालेले नुकसान पाहता हा अपघात किती भयंकर होता हे लक्षात येते. महामार्गाचे काम सुरु असल्याने वाहतूक एकाच बाजुने सुरु होती त्यामुळेच हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. मात्र दोन्ही गड्यांची गति अधिक होती, डोक्यातिल् हेल्मेट्स सुद्धा दुरवर फेकले गेले होते, अपघाता नंतर दोन्ही गाड्यांचे टायर पंक्चर झाले होते त्यावरूनच अपघाताची भीषणता लक्षात येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा