You are currently viewing राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत २० सप्टेंबरला समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत २० सप्टेंबरला समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत २० सप्टेंबरला समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

आंतराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य ; मिठमुंबरी, आचरा आणि देवबाग किनारे लोकसहभागातून होणार स्वच्छ

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ही मोहिम शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या औचित्यावर करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत देवगड तालुक्यातील मिठमुंबरी व मालवण तालुक्यातील आचरा व देवबाग या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. पर्यटनदृष्ट्या स्वच्छता मोहिम ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सागरी किनारे येथे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये संबंधित गटविकास अधिकारी यांनी नगरपालिका, नगरपंचायत विभागांच्या सहकार्याने संबंधित ग्रामपंचायत, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विभाग तसेच सामाजिक संस्था तसेच स्थानिक लोकसहभगातून स्वच्छता मोहिम राबविण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी सा.प्र बालाजी शेवाळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा