*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मोगरा फुलला..*
मोगरा फुलला मोगरा फुलला
ओंजळीत घेऊनी त्याला कपोली लावला..
मोगरा फुलला.. मोगरा फुलला…
सुगंधात वरचढ किती तो देखणा
कळी येताच वर करे खाणाखुणा
दोन दिवसांत कळीचे तो फूल झाला…
मोगरा फुलला.. मोगरा फुलला…
रूपावर भाळतात मुली ललना त्या
मनगटी खुलतो तो रंगेल पुरुषांच्या
सुगंधाचा कहर तो नाट्यगृही झाला..
मोगरा फुलला.. मोगरा फुलला…
साद घालतो दुरूनी जणू बोलावतो
गजऱ्यात वेणीवर किती भाव खातो
देवालाही प्रिय किती भुंगाही मोहरला
मोगरा फुलला.. मोगरा फुलला…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
