You are currently viewing हिमकडा कोसळून निसर्गाचा प्रकोप…

हिमकडा कोसळून निसर्गाचा प्रकोप…

10 हजार लोकांना महापुराचा फटका

उत्तराखंड

देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. धौलीगंगा नदीत मोठा हिमकडा कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत 10 हजार लोकांना या महापुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिमकडा कोसळून धौली गंगा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खबरदारी म्हणून भागीरथी नदीचे पाणी अडवण्यात आले आहे. अलकनंदाचे पाणी थांबवण्यात यावे यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =