*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”वक्रतुंड”*
वक्रतुंड गणेशा तव कीर्ती दिगंत
देवांचा देव सुबुद्धी देई गजानन।। धृ।।
श्री गणेश देई सकल मती प्रकाश
ज्ञानेश्वरी आरंभी भजती गणाधीश
ज्ञानेश्वरांनी वर्णिली तव महती अगाध।।1।।
शुंडा-शुंड करी दुश्चिन्हांचे खंडन
लंबोदराचे करिती गुणवर्णन
गणेश स्तुति करिती नामदेव संत।।2।।
ओम अनादि आद्या वेद वेदांत विद्या
वंद्य ही परम वंद्या गणेश स्वयंवेद्या
एकनाथ करिती स्तुति भागवतांत।।3।।
स्वामी दशदिशांचा पूजेत अग्रमान
सर्व देवता करिती वंदन पूजन
भक्त वाहती दूर्वा सुमने रक्तचंदन।।4।।
गणेशाला करिती आसनावर स्थापन
एकदंत करी पाशांकुश धारण
गजानन जपाने प्राणशक्ती वाढत।।5।।
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
