स्नेह नागरी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सभा १८ सप्टेंबर रोजी;
यशस्वी सभासदांचा होणार गौरव
सावंतवाडी :
स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, सावंतवाडी या संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता नॅब नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात, भटवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेचे सभासद किंवा त्यांच्या पाल्यांनी शैक्षणिक, क्रीडा अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असल्यास त्यांचा गौरव सभेदरम्यान केला जाणार आहे. यासाठी संबंधित माहिती मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संस्थेच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनंत व्यंकटेश उचगांवकर यांनी सर्व सभासदांनी या सभेसाठी उपस्थित राहून संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
