You are currently viewing किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक

मालवण

किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने किल्ले राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांसमोर यावेळी नतमस्तक झाले.

नौसेनेच्या वतीने ४ डिसेंबरचा नौसेना दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्ग च्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौसेना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिहं, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =