*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बंदीशी..प्राण माझा..!!*
जुन्या कटिबंध बंदीशी
आजही.. मी गातो
सूर लागो न लागो
तिला मी डिवचतो ..
सूर बंदीशीत ..रेंगाळले की
गाण ओठांवरचं थांबतं
तरीही समजावतो स्वतःला
कळेना…असं का होतं..
ती बंदिशचं ..माझा प्राण
तीच ..मला लगाम लावते
सूर फितूर ..होवू नये म्हणून
तीच.. मला पाठीशी घालते ..
किती ..कोंडले मी तिला
माझ्या कंठाच्या तळाशी
मैफिलीला विहरत येते
पण कां… थांबते गळ्याशी ..
आजही …बंदीश माझी
ओळखीची जखम ..जपते
काळजातून गातो तिला .. तरीही
ह्दयाचं..ह्दयांशी.. नातं तोडते
बाबा ठाकूर

