You are currently viewing कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी

कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी

केसरकर यांच्यासोबत एकही शिवसैनिक नाही..

कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी, अशा शब्दात शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी प्रतिक्रिया दिली. दिपक केसरकर यांच्यासोबत तालुक्यातील एकही शिवसैनिक नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेचा कट्टर शिवसैनिक आहे. ज्यांना जायचे असेल ते खुशाल जातील पण जे निष्ठावंत आणि कट्टर आहेत, ते राहतील त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही संघटनेसाठी काम करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा