“ग्लोबल गणेश फेस्टिव्हल 2025″अंतर्गत फोटोग्राफी आणि रील्स स्पर्धेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
शासनाच्या पर्यटन विभागामार्फत ग्लोबल गणेश फेस्टिव्हल 2025 या उपक्रमांतर्गत भव्य फोटोग्राफी आणि रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोकण विभागीय पर्यटन कार्यालयचे प्र. उपसंचालक (पर्यटन) शमा ढोक-पवार यांनी दिली आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे विविध पैलू दर्शविणारे फोटो व रील्स चित्रित करून सादर करता येतील. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याऱ्यांना पुढीलप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक, रु. 15 हजार, द्वितीय क्रमांक रु. 10 हजार, तृतीय क्रमांक 5 हजार.
या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2025 असून निवड झालेल्या स्पर्धकांनी त्यांची नोंदणी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. पर्यटन विभागाच्या या उपक्रमातून महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक गणेशोसवाचे विविध पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास हातभार लागेल, अशा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी www.globalganeshfestival.com. globalganeshfestival@gmail.
