You are currently viewing वालावल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि आरती मासिकाचे संपादक सि श्री उपाध्ये यांचा सन्मान!

वालावल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि आरती मासिकाचे संपादक सि श्री उपाध्ये यांचा सन्मान!

वालावल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि आरती मासिकाचे संपादक सि श्री उपाध्ये यांचा सन्मान!

माझ्या गरीबित शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण वाटा,,, श्री अतुल बंगे

वयाची, ९५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सन्मान!

कुडाळ (प्रतिनिधी)

वालावल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री सि श्री उपाध्ये यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्री अतुल बंगे आणि सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व श्री स्वामिंची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी श्री बंगे म्हणाले श्री उपाध्ये सरांनी मला शैक्षणिक मदत करत असताना वालावल हायस्कूल मधील माझ्या शैक्षणिक वाटचालीत श्री उपाध्ये सरांचा मोठा वाटा आहे माझ्या गरीबित सरांनी जे सहकार्य केले त्या सहकार्याचा मला आजही उपयोग समाजामध्ये झाला म्हणूनच मी माझी राजकीय आणि सामाजिक उंची गाठु शकलो सरांना आज ९५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल आज उपाध्ये कुटुंबीय समवेत त्यांचा सन्मान करण्याचे मला भाग्य लाभले असे गौरवोद्गार श्री बंगे यांनी काढले
यावेळी डॉ राजेंद्र उपाध्ये, सौ अर्चना बंगे, श्री अतुल बंगे माजी सरपंच श्री सुरेश वालावलकर, विजय वालावलकर, दीनकर बावडेकर, सौ मिना दीपक वालावलकर, रुतु उपाध्ये व इतर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा