You are currently viewing चौके, मालवण मध्ये २ सप्टेंबर रोजी सत्यवान रेडकर सरांचे निःशुल्क मार्गदर्शन

चौके, मालवण मध्ये २ सप्टेंबर रोजी सत्यवान रेडकर सरांचे निःशुल्क मार्गदर्शन

*चौके, मालवण मध्ये २ सप्टेंबर रोजी सत्यवान रेडकर सरांचे निःशुल्क मार्गदर्शन*

मालवण

गणेशोत्सव काळात उपस्थित असलेल्या मालवण वासियांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे संस्थापक, केंद्र शासनाचे अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र हे मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यान भ.ता. चव्हाण म.मा. विद्यालय, चौके, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे.

शिक्षण प्रेमी, शिक्षक, मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी कोणतेही सबब न देता वही व पेन घेऊन आवर्जून उपस्थित रहावे व आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा सोशल मिडिया द्वारे प्रचार-प्रसार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा