*लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीकांत धारकर लिखित अप्रतिम लेख*
*”आल्या गौराई अंगणी”*
ऑगस्ट महिना सुरू झाला की सणांची गर्दी व्हायला सुरवात होते . एका मागून एक हिंदू परंपरेनुसार या सणांच एक आगळ वेगळ महत्व आहे हे सण त्या त्या वेळेसच साजरा करण्या मागचा उद्देश लक्षात आला तर आपले पूर्व ज किती दूरदृष्टी चे होते हे लक्षात येत आता हेच बघा ना सर्वत्र कसा पाऊस पडलेला असतो तर काही
ठिकाणी पावसाची सरसर सुरू असते, निसर्ग हिरवा गार होतो, आणि वातावरणात एक वेगळीच चैतन्याची लहर पसरते. जनू निसर्ग आपल्या सणाच स्वागत करायला सज्ज झाला आहे वातावरणात किती उत्साह चैतन्या ने बहरलेली सृष्टी बघीतली पक्ष्याची किलबील आणि कोकिळेचा आवाज ” कुहुकुहु” कानावर आली आणि घरोघरी अंगणात रांगोळ्या, फुलांची आरास, आणि घरात भक्तीचा सुगंध दरवळला कि समजून जाव …” आल्या गौराई अंगणी!
गौरी म्हणजे प्रेम, शांती आणि समृद्धीचं मूर्तिमंत रूप. त्या येतात आपल्या माहेरी—आपल्या घरी. दरवर्षी भाद्रपद महिन्यात, गणपती आगमनाच्या उत्साहात गौराईंचं आगमन म्हणजे आणखीच आनंददायी क्षण असतो. आनंदाला उधाण येत आनंदाचा उबल डोस म्हटल्यास वाको होणार नाही .या दिवशी घरात केवळ देवी येत नाही, तर येते ते आईचं वात्सल्य, बहिणीचं प्रेम, आणि स्त्रीशक्तीचं तेज…
गौराईच्या आगमनानं घरभर नवा प्रकाश पसरतो. सुगंधी उटणं, नटलेली सवाष्ण, गोडान्नाचा नैवेद्य, ओवाळणीचं मांगल्य… हे सर्व फक्त परंपरा नाहीत, तर प्रेमाने गुंफलेली एक भक्तिरूपी परंपरा आहे. भक्तीची आराधना आहे . स्त्री शक्तीचा जागर आहे
आईसारख च गौराईला सुद्धा मनसोक्त मनात साठवून . घेतलं जातं. तिच्या पायांवर डोकं ठेवून आपण आपल्या साऱ्या चिंता विसरतो. तिचं हास्य, तिची प्रसन्न मूर्ती आपल्याला नेहमी सांगत सांगते “मी आहे, तू एकटा नाहीस.” हे असते ममत्व ..
प्रत्येकाला आपल्या आईचे रूप गौराईत दिसत असते ..
गौराई ही केवळ देवी नसते, ती असते आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचं प्रतीक – आई, बहीण, पत्नी, कन्या… तिच्या रूपात आपल्याला सर्व नात्यांचं सुंदर प्रतिबिंब दिसतं. तिचं आगमन म्हणजे त्या नात्यांचं पूजन करणे होय . पूर्ण पणे नतमस्तक होण . अनन्य भावे शरण जाणे .
गौराईसाठी केल्या जाणाऱ्या ओव्या, अभंग, आणि गजर हे केवळ शब्द नाहीत, ते असतात मनाचं अर्पण, भावनेचं दान. मनातील भाव . भक्तीला दिलेल शब्दाच दान … शब्दानी भावना व्यक्त करण्याच .. भक्ती मध्ये लीन व्हायच.. भक्तीत समरस व्हायच .. आराधना करायची
“गौराई आली गोंदावून,
सुनबाई झाली मनमुराद…
पाटावर बसली सोनसळी,
ओवाळीत मनीची समृद्धी घातली…” अस म्हणुन गौराईला आळवल्या जाते .. भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे गौराई..
गौराई येते आणि आपल्या आयुष्यातील अंध:कार नाहीसा करून जाते. तिचं असणं म्हणजे आशेचं, श्रद्धेचं आणि नात्यांच्या ऊबदारतेचं दर्शन आपल्याला होत . या दिवसात म्हणजे तीन दिवसात जेवढी भक्ती करता येइल तेवढी प्रतेक जण आपआपल्या परिने करतच असतो
पहिला दिवस येण्याचा… बसण्याचा..
दूसरा दिवस जेवणाचा .. प्रसादाचा..
तिसरा दिवस .. निरोपाचा … निघण्याचा …
शेवटी गौराई परत जाते तेव्हा मन भरून येत .. डोळे पाणावतात गौराई परत जायला निघते.. , पण मागे ठेवते आशीर्वादांची उब, नात्यांची गोडी, आणि पुन्हा येण्याचं वचन.
“आल्या गौराई अंगणी”… आणि घरात दाटून आलं समाधानाचं, सौंदर्याचं आणि भक्तीचं गारूड
श्रीकांत धारकर
बुलडाणा

