You are currently viewing २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा वाशी केंद्रातून ‘शेपूट राहिलं’ प्रथम

२० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा वाशी केंद्रातून ‘शेपूट राहिलं’ प्रथम

नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

२० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था, नवी मुंबई या संस्थेच्या ‘शेपूट राहिलं’ या नाटकाला प्रथम पारितोषिक आणि डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, न्यू पनवेल या संस्थेच्या ‘काय ते जाणावे’ या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच रविंद्र शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली या संस्थेच्या ‘सेज तुका’ या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या तिन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वाशी, नवी मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक प्रशांत निगडे (शेपूट राहिलं), द्वितीय पारितोषिक उल्हास रेवडेकर (काय ते जाणावे), तृतीय पारितोषिक श्रुती गणपुले (सेज तुका), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक ऋषिकेश वायदंडे (को म कि का), द्वितीय पारितोषिक सुनिल मेस्त्री (शेपूट राहिलं), नेपथ्य : प्रथम पारितोषिक प्रेरणा वाघमारे (पाणी), द्वितीय पारितोषिक वैष्णवी देव (सेज तुका), रंगभूषा : प्रथम पारितोषिक केदार ओटवणेकर (मुंग्यांची दुनिया), द्वितीय पारितोषिक दिपक कुंभार (आदिम) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ऋग्वेद आमडेकर (अ-फेअर) आणि अहिल्या मोरे (वेदनेचा मौन स्वर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सायली गायकवाड (आनंदी), अनया पिंगळे (अग्निपंख), विप्रा तांबडे (बँक ऑफ बालपण), अनन्या दराडे (पाणी), सिध्दी पिंगळे (एका चित्राची गोष्ट), श्रीवेद राणे (मुंग्यांची दुनिया), रिषभ शिंदे (स्वामी), अर्जुन झेंडे (शेपूट राहिलं), साईराज गणेश घोडचोर (काय ते जाणावे), अर्जुन आमडेकर (सेज तुका).

साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे दि. ८ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ३१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राची गोडबोले, वनराज कुमकर आणि कैलास पुप्पुलवाड यांनी काम पाहिले. तसेच समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, तिथी घाडी, मुकुंद जोशी, स्वप्नजा मुळये-भडभडे यांनी उत्तमप्रकारे जबाबदारी सांभाळली.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या बालनाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =