सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देशाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसीलदार विरसिंग वसावे, चैताली सावंत तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करून घेत संवाद साधला.
