कुडाळ शहरातील गोधळवाडी येथील नागरिकांनी शिवसेनेत केला प्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन केला प्रवेश
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
कुडाळ
कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी प्रवेशकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे सांगितले.
कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात त्यांच्या अनेक समस्या आहेत याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख प्रथमेश केळबाईकर यांनी या समस्या शहर प्रमुख अभि गावडे यांच्यापर्यंत आणल्या त्यानंतर शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी यांनी नागरिकांची भेट घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आमदार निलेश राणे या समस्या निश्चितपणे सोडवतील. असे सांगितले त्यानंतर या नागरिकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आज मंगळवार २६ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे महायुतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जहीर गोधड, नासिर गोधड, शाहिद गोधड, मोहम्मद शहा, अन्वर शेख, सोयल शेख यांच्यासह शेकडो युवक व महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभि गावडे, सरचिटणीस राकेश कांदे, उपशहर प्रमुख प्रथमेश केळाबाईकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, वरु राणे, शाखाप्रमुख संदेश सावंत, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी आदी उपस्थित होते.

