*मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात वैभववाडी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी*
वैभववाडी
मुंबई विद्यापीठ आयोजित ५८ वा युवा महोत्सव-२०२५ कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला.
या युवा महोत्सवात वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाने चमकदार कामगिरी करून विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.
या महोत्सवात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध कला प्रकार, संगीत, नृत्य, नाट्य आणि सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपला कला सादर केली. या महोत्सवात वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
ललितकला विभागातील मेहंदी कला प्रकारात कु.दीपा तेली हिने द्वितीय क्रमांक पटकावला. संगीत विभागात कु.हर्ष नकाशे याने सुगम गायन व भारतीय शास्त्रीय गायनात प्रथम क्रमांक मिळवून आपली बहुगुणी प्रतिभा सादर केली. तसेच नाट्यसंगीतात प्रभावी सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे वैभववाडी महाविद्यालयाचे नाव केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई विद्यापीठाच्या पातळीवर पोचवले आहे. संस्थेचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग. शिक्षेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच पुढील शैक्षणिक आणि कलात्मक प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या कामगिरीमुळे वैभववाडी महाविद्यालयाने सांस्कृतिक, कलात्मक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, या विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाचा अभिमान अधिकच उंचावत आहे.

