You are currently viewing “देवाभाऊ फाऊंडेशन” महाराष्ट्र राज्य” च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी सिद्धार्थ कुलकर्णी यांची निवड

“देवाभाऊ फाऊंडेशन” महाराष्ट्र राज्य” च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी सिद्धार्थ कुलकर्णी यांची निवड

नागपूर:

नागपूर येथील “देवाभाऊ फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सदस्यपदी ज्येष्ठ साहित्यिक सिद्धार्थ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सिनेसृष्टीत चित्रपट ध्वनिमुद्रक ते संकलन, लेखन, सहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक, अभिनेता अशी एक एक शिखरे सर करत आपली वेगळी छाप सोडणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री सिद्धार्थ कुलकर्णी होय. व्यक्तीची मेहनत, चिकाटी, जिद्द आणि इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर त्याला यश नक्कीच मिळते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. सिद्धार्थ कुलकर्णी ज्यांनी प्रचंड मेहनत आणि जिद्दीने प्रत्येक विभागात यश मिळवले शालेय जीवनापासून केवळ अभ्यास एके अभ्यास यातच अडकून न पडता खेळ, वाचन, लिखाण आणि जमेल तसं सामाजिक बांधीलकी जपण्याची जिद्द कायम ठेवत अभ्यासाबरोबर खेळ, लिखाण, वकृत्व यावरील आपली पकड कायम ठेवली यामुळेच अभ्यास, कला, क्रीडा, साहित्य, यात प्राविण्य मिळवत यश संपादन केले आणि अनेकानेक उपक्रमात पारितोषिकही मिळवली अशा हरहुन्नरी व्यक्तीची आवड लक्षात घेऊन ” देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ” या संघटनेचे संस्थापक – मुख्य समन्वयक श्री गजानन जोशी यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत केले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…!

प्रतिक्रिया व्यक्त करा